Online Shopping Fraud: Amazon वरून मागवला AC, पार्सलमध्ये निघाला कचरा; Kalmanuri चे Raju Kamble हैराण

Continues below advertisement
कळमनुरी (Kalmanuri) शहरातील राजू कांबळे (Raju Kamble) यांची ॲमेझॉनवरून (Amazon) केलेल्या ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर ऑफर्सना बळी पडून त्यांनी ॲमेझॉनवरून एसी विकत घेतला होता, पण त्यांना एसीऐवजी कचरा आणि लाकडाचे तुकडे मिळालेले आहेत. पार्सल उघडल्यानंतर त्यात ‘एसीऐवजी चक्क लाकडाचे तुकडे, पुठ्ठा, टाकाऊ कचरा निघाला’. कांबळे यांनी एसीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने आधीच भरली होती. पण जेव्हा ॲमेझॉनचा डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आला आणि त्यांनी ते उघडले, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. दिवाळीच्या काळात अनेक ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या सवलती देतात, पण याच काळात फसवणुकीचे प्रकारही वाढतात. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करताना सतर्क राहावे, असे आवाहन एबीपी माझा करत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola