Online Games : ऑनलाइन गेमच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीवर चाप, लवकरच कायद्यात बदल करणार

Continues below advertisement

ऑनलाइन गेमच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायद्यात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. ऑनलाइन गेममधून  करोडो रुपयांची उलाढाल होते मात्र खेळणार्याच्या  फसवणुकीची शक्यता अधिक आहे,  आहे. देशात खेळल्या जाणाऱ्या कुठल्याच ऑनलाइन गेम ला राज्य किंवा केंद्र सरकारची परवानगी नाही, हे सर्व गेम बेकायदेशीर पणे खेळवले जातात,सध्या अस्तित्वात असणारे कायदे जुने आणि  कमकुवत असल्यानं फसवणूक करणाऱ्याला कठोर शासन होत नाही.  सकाळी अटक केलेला संशयित काही वेळातच जामिनावर सुटून जात असल्याच नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी गृहविभागाच्या निदर्शनास आणून दिले होते, यानंतर कुठल्या कायद्यात काय बदल असावेत याचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते, त्यानुसार ऑनलाइन गेम नियमित करण्यासाठी चार कायद्यात त्यांनी बदल सुचविले असून 'लॉटरी आयुक्त' ह्या नव्या पदाची नेमणूक करण्याची शिफारस केलीय. यामुळे ऑनलाइन गेम खेळणाऱ्या कम्पनी नियमित होतील,खेळणार्याची फसवणूक टळेल आणि सरकारच्या महसुलात ही वाढ होईल नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सरकारला सादर केलेल्या अहवालात काय काय दडल आहे या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram