Onion Rate : शेतकऱ्याकडून चार एकर कांद्यावर रोटाव्हेटर, कांद्याला सरासरी 5 ते 6 रुपये दर
कांद्याचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे,अहमदनगरच्या नेप्तीच्या कांदा बाजारात कांद्याला सरासरी 5 ते 6 रुपये दर मिळत आहेत...उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे...इतर राज्यात वाढलेले कांद्याचे उत्पादन, कांद्याची घटलेली मागणी...सरकारचे कांदा निर्यात धोरण यामुळे कांद्याचे दर घसरल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगतात...अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर कांद्याची लागवड ही 30 टक्क्यांनी वाढली आहे.. कांद्याला भाव मिळत नसल्याने कर्जत तालुक्यातील नागापूर येथील सुभाष निंबोरे या शेतकऱ्यांने आपल्या एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवले आहे,