ABP News

Onion Insurance Fraud : महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यात कांद्याच्या पिकात विमा उतरवण्यात मोठा घोटाळा

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यात कांद्याच्या पिकात विमा उतरवण्यात मोठा घोटाळा.

पुणे, अहिल्यानगर ,धुळे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली नसताना उतरवला पिकाचा पिमा. 

तर अनेक ठिकाणी कमी क्षेत्र असताना कांद्याची लागवड जास्त दाखवून उतरवला विमा.

या आठ जिल्ह्यात चार लाख 2398 शेतकऱ्यांनी दोन लाख 24 हजार 318 हेक्टरवर कांद्या पिकाची लागवड. 

यात 83 हजार 911 शेतकऱ्यांनी 49 हजार 935 हेक्टरवर कांदा लागवड न करताच उतरवला विमा.

 तर 60285 शेतकऱ्यांनी 28 हजार 86 हेक्‍टरवर कमी क्षेत्रात असताना देखील अधिकच्या क्षेत्रावर कांदा दाखवत उतरवला विमा.

कृषी विभागाकडून विमा कंपन्यांना एक लाख 47 हजार 272 शेतकरी अपात्र करण्याच्या करणार सूचना विमा कंपन्यांना करणार ..

भाजीनगरमधील वैजापूरच्या शिऊर परिसरात 2 भाऊ आई वडील आणि बहीण त्यांची शेती आहे. या कुटुंबाची फसवणूक झालीय. .मात्र याच्या सर्व
शेतीवर अज्ञात व्यक्तीने पीकविमा भरून आपला खाते क्रमांक टाकून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या शेतजमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना पीक विमा मिळत नव्हता,कामाचा व्याप जास्त असल्याने त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी याबाबत पीक विमा कंपनी  आणि कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार केल्यानंतर त्यांना ही बाब समोर आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram