Onion Export : केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवली, कांदा निर्यातीला 3 लाख मेट्रिक टनाची मर्यादा
Continues below advertisement
Onion Export : केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवली, कांदा निर्यातीला 3 लाख मेट्रिक टनाची मर्यादाआता कांदा उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी.. अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरची बंदी हटवलीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. यासोबतच ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिलीये. डिसेंबर २०२३ मध्ये कांद्याचे वाढते भाव लक्षात घेऊन केंद्राने ३१ मार्च २०२४ पर्यंत बंदी घातली होती. मात्रा आता ही कांदा बंदी उठवण्यात आलीये.
Continues below advertisement