Onion Export Duty JNPT : निर्यातीसाठी आलेला कांदा चार दिवसांपासून JNPT वर अडकला ABP Majha
Continues below advertisement
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर तब्बल 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरून जणू रण पेटलं आहे. कारण केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसतो आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं नाफेडमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांद्याची प्रति क्विंटल दोन हजार 490 रुपये दरानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण कांदा निर्यातदार आणि विरोधकांनी त्याऐवजी प्रति क्विंटल चार हजार रुपये दराची आणि निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये नवी मुंबईतल्या जेएनपीटी बंदरात निर्यातीसाठी आलेला कांदा गेल्या चार दिवसांपासून अडकून पडला आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलनं घेतलेला आढावा.
Continues below advertisement