One State One Uniform : एक राज्य एक गणवेश योजनेत बदल, राज्य सरकारचा निर्णय

One  State One Uniform : एक राज्य एक गणवेश योजनेत बदल, राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने एक राज्य एक गणवेश योजनेवरुन यू-टर्न घेतलाय. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच देण्यात येणार आहे. तर पुढील वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश' योजना लागू करण्यात येणार आहे. मोफत गणवेश योजनेंतर्गत अनेक शाळांनी आणि कापड उद्योजकांनी विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय सन २०२३- २४ या वर्षासाठीच्या गणवेशाची तयारी केलीय. याच तयार झालेल्या गणवेशामुळे संबंधितांचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. याचाच अर्थ, एक राज्य, एक शाळा ही योजना या वर्षापुरती तरी कपाटातच राहणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola