Solapur ST : सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा आंदोलन, कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही
एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची धग पुन्हा वाढली आहे. कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. या आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी भाजपसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितलं.