Maharashtra Winter Session :अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान होणार

Continues below advertisement

यंदाच्या हिवाळी अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान होण्याची शक्यता. नागपुरात उद्यापासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विरोधकांनी या अधिवेशसाठी विशेष तयारी केली आहे. सरकारला कोंडीत पडकण्यासाठी विरोधकांकडे वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, महाराष्ट्राच्या हातून गेलेले प्रकल्प, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांमुळे राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी होणार आहे. विरोधकांच्या हाती एवढे मुद्दे असल्यामुळे शिंदे - फडणवीस सरकारची या अधिवेशनात अक्षरशः कसोटी लागणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram