Diwali 2021 : पाडव्यादिवशी गुळ, हळदी आणि देवगडच्या हापूस आंब्याचा सौदा, पाहा किती मिळाला आहे दर
Continues below advertisement
कोल्हापूरचा गूळ देशभर प्रसिद्ध आहे, त्यामुळे कोल्हापूरच्या गुळ सौद्याकडे देशभरातील गुळ व्यापारी आणि शेतकऱ्यांचे लक्ष असतं. परंपरेप्रमाणे आज दिवाळीच्या पाडव्यादिवशी कोल्हापूरच्या बाजार समितीत गूळ सौद्यांना सुरूवात झाली. पहिल्या दिवशी गुळाला 3400 ते 4200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. तर सांगली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजारसमितीत आजपासून हळदीच्या सौद्यांना सुरुवात झाली आहे. यंदा हळदीला साडे आठ ते नऊ हजार दर इतका दर मिळालाय. तिकडे या हंगामातील देवगड हापूसची पहिली पेटी बाजारात आलीय. पाच डझनाच्या पेटीला पुण्यात 18 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.
Continues below advertisement