Prakash Ambedkar vs Sanjay Raut : अकोल्याची जागा लढण्यावरुन प्रकाश आंबेडकर- संजय राऊत आमने -सामने
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे. अकोला ही जागा परंपरेनुसार प्रकाश आंबेडकरांनी लढावी, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.. तर त्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिलीय.. अकोलाच काय मी मुंबईतूनही लढेन, आधी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगा.. असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.