Human-Elephant Conflict: 'ओंकार' हत्तीसाठी सिंधुदुर्गात बॉम्ब, दांडक्याने मारहाण; Vantara मध्ये पाठवण्याचं षडयंत्र?
Continues below advertisement
सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि गोवा (Goa) सीमेवर 'ओंकार' नावाच्या हत्तीने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे, तर दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. प्राणीप्रेमींनी 'त्याला जखमी करुन जखमी दाखवून न्यायालयाचा आधार घेऊन उपचारासाठी वनतळात वनतारामध्ये (Vantara) नेण्याचे षडयंत्र तर नाही ना?' असा सवाल करत हत्तीवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. कर्नाटकातून (Karnataka) आलेल्या कळपापासून वेगळा झालेला हा 'ओंकार' हत्ती गेल्या महिनाभरापासून दोडामार्ग (Dodamarg) आणि सावंतवाडी (Sawantwadi) तालुक्यात शेती आणि बागांची नासधूस करत आहे. त्याला पकडण्याचे वनविभागाचे (Forest Department) प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. मध्यंतरी त्याला गुजरातमधील 'वनतारा' येथे पाठवण्याची चर्चा होती, मात्र आता हे प्रकरण न्यायालयात आहे. या हत्तीच्या दहशतीमुळे शेतकरी जीव मुठीत घेऊन जगत आहेत, तर दुसरीकडे अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement