Omicron Update : ओमायक्रॉनबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर 'माझा'वर ABP Majha
ओमायक्रॉनग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय... पण ओमायक्रॉनची धास्ती घेण्याचं कारण नाही, कारण ओमायक्रॉनवर मात करणं सहज शक्य आहे... याची प्रचिती दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात आलीय... ओमायक्रॉनबाधितांना पॅरासिटेमॉल आणि विटॅमीन सीचं औषध देऊन रुग्णांवर उपचार करण्यात आलेयत... दिल्लीतील या सर्वात मोठ्या रुग्णालयात आतापर्यंत दाखल ४० ओमायक्रॉनबाधितांपैकी १९ रुग्णांनी कोरोनावर मात केलीय... तर अशाचप्रकारे उस्मानाबादमध्ये देखील दोन रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि ते देखील अवघ्या काही दिवसात बरे झाल्याचं समोर आलंय... दूबईहून भारतात आलेल्या जगदीश शिंदे आणि त्यांच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण झाली... आणि या दोघांवर ९ डिसेंबर ते २४ डिसेंबरपर्यंत उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले... आणि आता हे दोघेही ओमायक्रॉनमुक्त झालेयत...
दरम्यान उस्मानाबादमधील ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांना बरे करणारे डॉक्टर सचिन गायकवाड आपल्यासोबत आहेत... नेमकं या रुग्णांना कोणती औषधं दिलं आणि कशाप्रकारे उपचार करण्यात आले हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत... त्यांच्याशी बातचित करणार आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी