Omicron चाचणीचा अहवाल आता मिळणार 2 तासांमध्ये, ICMR कडून चाचणीसाठी किटची निर्मिती
Continues below advertisement
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचे रुग्ण देशातील विविध राज्यांमध्ये आढळत आहेत. आता आसाममधील दिब्रुगड येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञांनी एका किटची निर्मिती केली आहे. या किटमुळे ओमायक्रॉन चाचणी अहवाल दोन तासांमध्ये मिळणार आहे. ‘ओमायक्रॉन’चाचणी किट लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Continues below advertisement