Omicron: भारतात बूस्टर डोसबाबत निर्णयाची अजूनही प्रतिक्षा, ओमायक्रॉनवर बूस्टरचा उतारा? ABP Majha
Continues below advertisement
जगभरात ओमायक्रॉनचं नवं संकट उभं ठाकल्यानंतर बूस्टर डोसची चर्चाही सुरू झालीय. या पार्श्वभूमीवर नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटवर बूस्टर डोस ७० ते ७५ टक्के संरक्षण देतो, असा निष्कर्ष ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेनं काढला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासात ही नवी माहिती समोर आली आहे. दुसऱ्या डोसनंतर काही महिन्यांनी डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचंही सांगण्यात येतंय. दुसरीकडे भारतात बूस्टर डोसच्या निर्णयाबाबत अजूनही प्रतीक्षाच आहे. शास्त्रीय पूरावे ग्राह्य धरूनच याबाबत निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी काल लोकसभेत सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Uk Doctor Worldwide Infection Bharti Pawar Crisis Union Minister Of State For Health Booster Dosage Omacron Conclusion Health Security