Omircon : आग्रा शहरातून तब्बल 45 परदेशी पर्यटक बेपत्ता; शोधासाठी प्रशासनाची शर्थ ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Dec 2021 10:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. ताजमहालाचं शहर असलेल्या आग्र्यातून तब्बल ४५ परदेशी पर्यटक बेपत्ता झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढले. आरोग्य विभाग आणि लोकल इंटेलिजन्स युनिटनं त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केलेय. प्रशासनानं सध्या ४ पथकं तयार केली आहेत. या पर्यटकांनी चुकीचं नाव, चुकीचा हॉटेलचा पत्ता दिला होता त्यांचा आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकही बंद असल्यानं ते मायदेशी परतले आहेत अथवा नाही याची माहिती प्रशासनाला मिळत नाहीये.