om Satam : Olympic Games:ओम साटमची ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी, घरची परिस्थिती बिकट पण स्वप्नासाठी धडपड

Continues below advertisement

om Satam : Olympic Games:ओम साटमची ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी, घरची परिस्थिती बिकट पण स्वप्नासाठी धडपड

नुकतीच पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा पार पडली. यात भारतातील खेळाडूंनी अथक मेहनत घेत चांगली कामगिरी केली, तर काही खेळाडूंनी पदके देखील मिळवली असून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. मुंबईतील बीडीडी चाळीतील एका हवालदाराचा मुलगा ऑलम्पिकचे स्वप्न पाहत मेहनत घेतोय. त्याचं नाव म्हणजे ओम साटम.. ओम सध्या स्विमर ऑलिम्पिकसाठी तयारी करतोय. मात्र घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं कधी कधी त्याला सरावासाठी मागे प़डावं लागतं. त्यामुळे त्याच्या वडिलांकडून हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान ही बातमी माझा नं दाखवल्यानंतर  क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी स्विमर ओम साटमची भेट घेतलीय. तसंच ॲालिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचंही संजय बनसोडे यांनी सांगितलंय. तसंच शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी ओम साटमची भेट घेऊन त्याला शुभेच्छाही दिल्या.

 मुंबईतील वरळी बीडीडी चाळ..   या चाळीत  मुंबईला सुरक्षा पुरवणारे अनेक पोलीस बांधव  दाटी वाटीत छोट्याशा घरात राहतात. यातच प्रवीण साटम नावाचे मुंबई पोलिसातील एक हेड कॉन्स्टेबल आहेत . एक मुलगा, मुलगी आणि पत्नी अस साटम यांचं कुटुंब आहे. दहा बाय बाराच्या खोलीत गेल्या अनेक वर्षांपासून ते राहत आहेत. याच घरातून त्यांचा मुलगा ओम साटम हा आपल्या स्विमिंग खेळातून सध्या सर्वत्र आपली छाप पाडत आहे. जिल्हा पातळीपासून राष्ट्रीय स्तरावर स्विमिंग मध्ये ओम ने साधारण पाचशेच्या आसपास मेडल आणि प्रमाणपत्र मिळवत नाव कामावले आहे. तो सध्या  2028 ला होणाऱ्या ऑलिम्पिकबरोबर इतर स्पर्धांची तयारी करतोय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram