Old Pension Strike : संपकरी कर्मचाऱ्यांचा पेपर तपासणी करण्यास नकार, 10 वी बोर्डाचा निकाल लांबणार?
Old Pension Strike : संपकरी कर्मचाऱ्यांचा पेपर तपासणी करण्यास नकार, 10 वी बोर्डाचा निकाल लांबणार?
राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपकाळात त्यांनी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळं संप सुरू राहिल्यास दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या ७५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहण्याची शक्यता आहे. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर जवळपास पूर्ण झाले आहेत. पण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे आणखी तीन पेपर बाकी आहेत. या परिस्थितीत शुक्रवारच्या पेपरनंतर जवळपास तीस लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहतील. त्यामुळं दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत जाहीर व्हावा, यासाठी संपासंदर्भात वेळेत निर्णय होणं अपेक्षित आहे.