Old Pension Scheme : सरकारसोबत सकारात्मक चर्चा, कामावर हजर राहणार संघटनेचं आश्वासन
Continues below advertisement
गेले ७ दिवसांपासून राज्याचा गाडा ठप्प करणारा राज्य सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेरीस मागे घेण्यात आलाय... सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानं हा संप मागे घेत असल्याचं कर्मचारी समन्वयक समितीचे विश्वास काटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. कर्मचाऱ्यांची मूळ मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं सुरू करण्याबाबत सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं... तसंच संप मागे घेतल्यानं कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावं असं आवाहन कर्मचारी संघटनेनं केलंय... त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू होऊन राज्याचा ठप्प गाडा पुन्हा सूर करावा शेतकरी, रुग्ण , सर्वसामान्य नागरीक यांचे हाल सुधारावे एवढीच अपेक्षा आहे.
Continues below advertisement