Old Pension scheme:मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठोस तारीख न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांचा संप, संपूर्ण आढावा
Continues below advertisement
Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठोस तारीख न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांचा संप , नागपुरातून आढावा
जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून संपावर आहेत. कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक झाली, मात्र या बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्याने संघटना संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपामुळे शासकीय कामासोबत आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटीमधील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. नाशिकमधील जिल्हा रुग्णालयाबाहेर परिचारिका आंदोलन करत आहेत. याशिवाय नागपुरातही कर्मचाऱ्याचं आंदोलन सुरु आहे.
Continues below advertisement