Ola UBER Update : ओला, उबरला सरकारचा दणका, बुकींक रद्द केल्यास पैसे ग्राहकाला मिळणार : ABP Majha
Continues below advertisement
आरामदायी प्रवास करायचा असेल वा घाईगर्दी न करता अन्यत्र कुठे जायचे असेल तर ओला, उबर या ॲप आधारित सेवांचा हमखास वापर केला जातो. गाडी बुक केली जाते. मात्र, कधी कधी गाडी येतच नाही. सेवा रद्द केल्याचा मेसेज येतो. अशावेळी मोठी अडचण होते. परंतु, आता ओला, उबरकडे कॅब बुक करूनही एखाद्या चालकाने भाडे नाकारल्यास त्याला ५० ते ७५ रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आलीये. तसेच, विशेष म्हणजे हे पैसे कॅब बुक करणाऱ्या प्रवाशाला मिळणार आहेत. ओला आणि उबर या सेवा नेमक्या कोणत्या नियमांखाली सुरू आहेत आणि त्या ग्राहकाभिमुख धोरणे राबवतात का, याबाबत उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले हाेते.
Continues below advertisement