Chandrapur : चंद्रपुरातील दारुबंदी उठल्यानंतर आजपासून अधिकृत दारु विक्री सुरु होण्याची शक्यता
Continues below advertisement
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून दारू विक्रीला सुरुवात होणार का? याबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. खाजगीत, सोशल मीडियावर आणि जो जिथे भेटला तिथे हीच चर्चा सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील 98 दारूविक्रीचे परवाने पुन्हा एकदा बहाल केले आहे आणि दारूविक्रेत्यांना हे परवाने देण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. मात्र शनिवारी आणि रविवारी सर्व स्टॉकिस्टची दुकानं बंद असल्याने दारू मागवता आलेली नाही. त्यामुळे आज दुपारपर्यंत स्टॉकिस्टकडून माल चंद्रपुरात आला तर दारूविक्री अधिकृतपणे सुरु होऊ शकते. मात्र जिल्हा प्रशासन याबाबत अजून देखील अधिकृतपणे बोलण्यास तयार नसल्याने दारूविक्री नक्की कधी सुरु होणार याबाबत संभ्रम कायम आहे.
Continues below advertisement