OBC Reservation : मनपा, जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात सोडत : ABP Majha
सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता या आरक्षणासाठी नव्यानं सोडत निघणार आहे.महापालिकांमधील अनुसूचित जाती आणि जमातीचं आरक्षण कायम ठेवण्यात येणार आहे. तर महिलांचं आरक्षण रद्द करून पुन्हा नव्यानं आरक्षण सोडत काढली जाणार आहे. महापालिकांसाठीची सोडत २९ जुलै रोजी होणार आहे.