OBC Morcha Nagpur : जीआर रद्द न झाल्यास मुंबई, पुणे जाम करू : Vijay Wadettiwar
Continues below advertisement
नागपुरात (Nagpur) झालेल्या ओबीसी महामोर्चात (OBC Mahamorcha) २ सप्टेंबरचा सरकारी जीआर (GR) रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या मोर्चात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आक्रमक भूमिका घेतली, तर दुसरीकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांसारखे प्रमुख नेते गैरहजर राहिल्याने ओबीसी नेतृत्वात फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. 'जर हा जीआर रद्द झाला नाही तर आम्ही मुंबईसह पूर्ण पुणे, पूर्ण ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही', असा थेट इशारा विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, ते छगन भुजबळांच्या नादी लागले आहेत. या मोर्चात अनिल देशमुख, महादेव जानकर आणि प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. हा मोर्चा म्हणजे ओबीसी समाजाच्या हक्कांसाठीचा लढा असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement