OBC Quota: लक्ष्मण हाके आक्रमक, Manoj Jarange पाटील यांच्यावर गंभीर टीका
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली. ओबीसींचे आरक्षण संपवायचे आहे का, हे मुख्यमंत्री आणि जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व नेत्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन हाके यांनी केले. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून जरांगे पाटील लोकांच्या मनात दहशत निर्माण करत आहेत, असे हाके म्हणाले. ओबीसी समाज चिंतेत आणि दुःखात आहे. जरांगे पाटील यांच्या वागण्यामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येते की काय, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि सर्व पक्षांच्या ओबीसी नेत्यांना, तसेच जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार-खासदारांना आमची विनंती आहे की, "तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय का?" हाके यांच्या मते, जरांगे पाटील यांचा मानसिक परिणाम झाला आहे आणि ते मनोरुग्ण आहेत. संविधान, मागास वर्ग, न्यायालयाचे निर्णय आणि शासन-प्रशासन न मानणारा हा माणूस लोकशाहीविरोधी वागतोय. हा माणूस झुंड गोळा करून हुकूमशहाप्रमाणे वागतोय.