OBC Protest | गेवराईत लक्ष्मण हाकेंचे शक्तिप्रदर्शन, हजारो OBC कार्यकर्ते सहभागी
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ओबीसी समाजाचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे. लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत गेवराई शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारो ओबीसी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. त्या घटनेनंतर लक्ष्मण हाके पहिल्यांदाच गेवराईत दाखल झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेवराई शहरात मोठ्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरलेला दिसतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात, जिथे यापूर्वी राडा झाला होता, त्याच ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी वज्रमुठ दाखवली आहे. बाग पिंपळगाव आणि रेवकी देवकी या दोन्ही भागांमध्ये लक्ष्मण हाके यांची सभा देखील आयोजित करण्यात आली आहे.