OBC Protest | मुंबईत OBC समाजाचा एल्गार, उद्या Nagpur मध्येही मोर्चा
Continues below advertisement
मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजानेही आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. रायगडसह संपूर्ण कोकणातून हजारो आंदोलक आझाद मैदानात एकवटले आहेत. ओबीसी कोट्यात कुणालाही आरक्षण देऊ नये आणि कुणबी समाजाला ओबीसी प्रमाणपत्र न देता आमचं आरक्षण अबाधित ठेवावं, या प्रमुख मागण्या सरकारसमोर मांडल्या जाणार आहेत. त्याचवेळी, उपराजधानी नागपुरातही ओबीसी समाजाचा उद्या मोठा मोर्चा निघणार आहे. काँग्रेसचे आमदार आणि विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज सहभागी होण्याची शक्यता आहे. नागपुरातील या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement