Babanrao Taywade : छगन भुजबळांवर ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची नाराजी

Continues below advertisement
OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे (Babanrao Taywade) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. 'कोण बबनराव तायवडे आपल्याला माहित नाही', अशी प्रतिक्रिया देत छगन भुजबळ यांनी त्यांना ओळखण्यास नकार दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. विजय वडेट्टीवार यांचा जरांगे पाटील यांच्यासोबतचा एक जुना व्हिडिओ भुजबळ यांनी जाहीर सभेत दाखवल्याने बबनराव तायवडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. भुजबळ हे समाजाचे ज्येष्ठ नेते आणि वडिलांच्या स्थानी आहेत, त्यामुळे एखाद्या मुलाकडून झालेली चूक त्यांनी सार्वजनिकरीत्या चव्हाट्यावर आणायला नको होती, असे तायवाडे म्हणाले. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडून चुका होऊ शकतात, पण एका चुकीमुळे कोणी समाजाचे नेतृत्व करू शकत नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत तायवडे यांनी व्यक्त केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola