OBC Morcha | जालन्यात आज ओबीसींचा मोर्चा; सर्व पक्षाचे ओबीसी नेते सहभागी होणार

जालना येथे ओबीसी समाजाच्यावतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. जनगणनेत ओबीसीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून . लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार असून, या मोर्चात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार वनमंत्री संजय राठोड, माजी मंत्री  पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर महादेव जानकर, समीर भुजबळ विकास माहात्मे यांसह सर्वच पक्षातील नेते उपस्थित राहणार आहे, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून या मोर्चाला सकाळी 11 वाजता  सुरवात होणार असून  हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित होणार आहे, दरम्यान ओबीसी मोर्चा च्या मागण्यांचे  निवेदन सरकारच्या वतीने मंत्री विजय वडेट्टीवार हे स्वीकारणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola