OBC Protest: 'ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही', विजय वडेट्टीवार यांचा Nagpur मोर्चातून सरकारला इशारा
Continues below advertisement
नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या महामोर्चात, मराठा आरक्षणासंदर्भातील २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चात महत्त्वाची भूमिका बजावली. वडेट्टीवार म्हणाले, ‘आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, पण ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही’. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून सुरू होऊन संविधान चौकापर्यंत गेला, जिथे त्याचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चात विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून हजारो ओबीसी बांधव आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काढलेला जीआर ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण करणारा असल्याचा आरोप करत तो त्वरित रद्द करावा, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement