OBC Quota Row: बीडमध्ये ओबीसींचा एल्गार, राजकीय नेत्यांची एकाच मंचावर गर्दी
Continues below advertisement
बीडमध्ये (Beed) आज ओबीसी समाजाची (OBC Community) महाएल्गार सभा पार पडणार असून, या सभेचे नेतृत्व राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) करणार आहेत. ‘कोणाच्या ताटातले काढून कोणाला देणार नाही’, अशी भूमिका धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि लक्ष्मण हक्के (Laxman Hakke) असे अनेक प्रमुख ओबीसी नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. विशेषतः धनंजय मुंडे हे प्रथमच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर या नेत्यांसोबत भूमिका मांडणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement