OBC Quota Row: Beed मध्ये महाएल्गार, Chhagan Bhujbal-Dhananjay Munde एकाच व्यासपीठावर!

Continues below advertisement
बीडमध्ये ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात महा एल्गार सभा पार पडली. या सभेला धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यासह प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. ‘आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, हक्क अबाधित राहतील,’ असे भावनिक आवाहन छगन भुजबळ यांनी या सभेतून केले. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या या मेळाव्याच्या निमित्ताने छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर दिसले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधले गेले. ओबीसींच्या व्यासपीठावर धनंजय मुंडे यांनी प्रथमच आपली भूमिका मांडल्याने त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले होते. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सरकारने काढलेला जीआर रद्द करावा, ही या सभेची प्रमुख मागणी होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola