OBC Reservation Row:'जरांगे फक्त मुखवटा,मागे क्रूर Maratha नेते', Laxman Hake यांचे फडणवीसांना पत्र

Continues below advertisement
ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'जरांगे हा फक्त मुखवटा आहे, त्यांच्या आडून क्रूर मराठा राजकीय नेते, आमदार, खासदार, कारखानदार यांचे हेतू साध्य करत आहेत,' असा गंभीर आरोप हाके यांनी पत्रात केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२२ पूर्वीचे आरक्षण ग्राह्य धरून पंचायत राज निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते, ज्यामुळे ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र, जरांगे यांनी सरकारच्या मानबुटीवर बसून हैदराबाद गॅझेटचा (Hyderabad Gazette) जीआर मंजूर करून घेतला, जो ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणारा आहे, असा दावा हाके यांनी केला आहे. या जीआरमुळे बोगस दाखले काढून आरक्षण लाटणाऱ्यांना बळ मिळेल आणि प्रस्थापित मराठा समाजाला सरपंच पदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व पदे स्वतःकडे ठेवायची आहेत, असेही हाके यांनी म्हटले आहे. या एका जीआरमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचे स्वप्न संपवले गेले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola