OBC आयोगाला पुरेसा निधी,मनुष्यबळ दिलं जात नाही, राज्यातील सर्वपक्षीय नेते पंतप्रधानांना भेटणार
Continues below advertisement
राज्य मागासवर्ग आयोगाची इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठीची आणखी एक बैठक पुण्यातील शासकीय विश्रामगृहात होतेय. या बैठकीला आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्यासह आयोगाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. मात्र या आयोगाला आवश्यक तो निधी आणि मनुष्यबळ सरकारकडून दिला जात नसल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केलाय. तसंच बिहारप्रमाणेच राज्यातील सर्वपक्षीय नेते जातीनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधानांना भेटण्यासाठी प्रयत्न करतायत अशी माहिती या नेत्यांनी दिलीय.
Continues below advertisement