OBC Demands: विजय वडेट्टीवार आणि अतुल सावे यांच्या महत्त्वाच्या बैठका
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्या एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. चार सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना मंत्री अतुल सावे यांनी "ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावरती बैठक आयोजित केली जाईल" असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुंबईमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही बैठका ओबीसी समाजाच्या हितासाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.