Ajit Pawar | अजित पवार- सुप्रिया सुळे एकत्र शिवतीर्थावर जाणार | ABP Majha
उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळूनही उपमुख्यमंत्री कोण होणार याचा पेच अद्याही सुटलेला नाही. उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा असतानाच, अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. अजित पवार सकाळपासूनच आपल्या निवासस्थानी नसल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे.