coronavirus | पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना नर्सेसच्या संघटनांचं पत्र, पीपीई कीट मिळत नसल्याची तक्रार
नर्सेस संघटनांनी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्र लिहून रुग्णालयात असलेल्या गैरसोयींबद्दल माहिती दिली आहे. जन स्वस्थ अभियानतर्फे आयुक्तांना पत्र लिहिण्यात आलं आहे. या पत्रात लिहिलं आहे की, आवश्यक ते काळजी घेत जात नाही. नर्सेसना पीपीई किट मिळत नाही. रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांचे विलगीकरण योग्य पद्धतीने होत नाही. कोविड-19 रुग्णांना हाताळणाऱ्या नर्सेस घरी जातात आणि बसमधून प्रवास करुन रुग्णालयात येतात.