MLA CAR LOAN : आता आमदारांना गाडी खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज मिळण्याची शक्यता ABP MAJHA
Continues below advertisement
इंधनाच्या किमतीतून सरकार मालामाल झालं असलं तरी त्याचा फायदा जनतेला कितपत होईल याची शंकाच आहे. कारण, मालामाल सरकारला आता आमदारांच्या आरामदायी प्रवासाची चिंता आहे.. कारण गाडी खरेदीसाठी आमदारांना आता ३० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. आजच्या बैठकीत या निर्णयाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातले आमदार आता स्कोडा, एमजी ग्लोस्टर, एमजी झेड एक्स, इनोव्हा यासारख्या आरामदायी गाड्या घेऊ शकतील. सध्या आमदारांना गाडी घेण्यासाठी १० लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं. ही मर्यादा वाढवण्याची मागणी झाल्यानंतर ते ३० लाखांपर्यंत करण्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Mla महाराष्ट्र आमदार 10 लाख आमदार महाराष्ट्र कार लोन 30 लाख 10 लाख Car Loan 30 Lakhs 10 Lakhs