Eknath Shinde On Karnataka : महाराष्ट्रातली एक इंचही जागा कुठे जाऊ देणार नाही- मुख्यमंत्री

Continues below advertisement

राजकारणी आणि त्यांचे आध्यात्मिक गुरू हे काही महाराष्ट्राला नवं नाही... पण आता राजकारणी आपल्या राजकीय भवितव्यासाठी अंकशास्त्राचा आधार घेत असतील तर काय म्हणावं... असं घडल्याचा आम्ही दावा करत नाही मात्र अंनिसनं असा आरोप केलाय.. आणि तोही राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल शिर्डी दौऱ्यावर होते... यावेळी त्यांनी शिर्डीजवळच्या वावी गावच्या ईशानेश्वर मंदिराला भेट दिली... या मंदिराचे ट्रस्टी कॅप्टन अशोक खरात हे अंकशास्त्राचे अभ्यासक असल्याची माहिती आहे.. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकचडे स्वतःचं आणि राज्य सरकारचं भवितव्य जाणून घेतलं असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलाय. अंनिसनं असे आरोप केल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या संपूर्ण आरोपांवर मुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही मात्र सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram