North India Heavy Rain : उत्तर भारतात सहा दिवसांपासून हाहाकार, पावसीमुळे 100 जणांचा मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

उत्तर भारतात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी महापुरासारखी परिस्थिती निर्माण झालीय. यामध्ये एकूण १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू हिमाचल प्रदेशमध्ये झालेत. तिथं ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अन्य राज्यांमध्ये ५६ जण मृत्युमुखी पडले आहेत. हिमाचलमध्ये  3 दिवसांत 12 इंच पाऊस पडला, जो सरासरीपेक्षा 10 पटीनं अधिक आहे. इथे डोंगर कोसळत आहेत. भूस्खलनामुळे घरे आणि पूल कोसळत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशसह 24 राज्यांमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्याचवेळी, 12 जुलैपर्यंत हिमाचलमधील 12 पैकी 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram