पदासाठी कुणीही चळवळ करू नये,संभाजीराजेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळे मनातील प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये. अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजी राजेंच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी दिली.