Supreme Court On NEET Exam : नीटची फेरपरीक्षा नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

Continues below advertisement

नीट परीक्षा आणि त्या संदर्भातील कथित घोटाळ्याने  देश हादरला आहे. या बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी   सुरू आहे. बऱ्याच जणांना या परीक्षेत मिळालेले गुण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गुजरात मधील एका मुलीला पडलेल्या गुणांबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याबद्दल     दाखल  झालेल्या याचिकेत तिने परीक्षा दिलेल्या बेळगाव येथील परीक्षा केंद्राचा मुद्दा पुढे आला आहे. यामुळे आता नीट परीक्षेच्या घोटाळ्यात बेळगाव येथील परीक्षा केंद्रही सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर आले  आहे.                 गुजरात येथील एका मुलीने  बेळगाव मधील परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा दिली होती. यामध्ये तिला 705 गुण मिळाले. आणि विशेष म्हणजे ही मुलगी बारावी परीक्षेत नापास झाली असून  मुलीला नीट मध्ये 705 गुण कसे मिळाले. असा याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात  प्रश्न उपस्थित केला आहे. या संदर्भात आढावा घेताना संबंधित परीक्षा केंद्राचा सक्सेस दर काय आहे असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला असता, त्याचे उत्तर केवळ सहा टक्के असे आले आहे. यामुळे त्या परीक्षा केंद्रात परीक्षा दिलेल्या एकूण परीक्षार्थी पैकी  फक्त सहा टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये त्या मुलीचा समावेश आहे .आता   यापुढील न्यायालयीन चौकशीत जे काही निष्पन्न होणार आहे त्याकडे संपूर्ण कर्नाटकाचे आणि बेळगाव जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे. संबंधित परीक्षा केंद्र नेमके कुठे होते आणि तेथे कोणते गैरप्रकार झाले याची चौकशी आता न्यायालयीन आदेशानुसार होणार आहे.  न्यायालयीन कामकाजा संदर्भात बातमी देणाऱ्या लाईव्ह लॉ या वेबसाईटनेही या संदर्भात भाष्य केले असून यामुळे बेळगाव येथील परीक्षा केंद्राची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram