Parambir Singh | अनिल देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी पुरावे नाहीत :परमबीर सिंह
अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखे काहीही पुरावे शिल्लक नाहीत अशी भूमिका घेत परमबीर सिंह यांनी चांदिवाल आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. अनिल देशमुखांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदिवाल यांच्या एकसदस्स्यीय आयोगापुढे झालेल्या गेल्या सुनावणीत परमबीर यांच्यावतीनं हे स्पष्ट करण्यात आलं. आयोगानं वारंवार समन्स बाजावूनही परमबीर सिंह चौकशासाठी गैरहजर राहिलेत.