पवार-शाह भेटीच्या वृत्तानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर वाढलं? पवारांच्या ट्वीटमध्ये सोनिया, राहुल, प्रियांकांचा उल्लेख नाही

Continues below advertisement

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीच्या वृत्तानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दरी वाढली का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.. शरद पवार यांची तब्येत खराब असून बुधवारी शस्त्रक्रिया होणार आहे, असं पक्षाने स्पष्ट केल्यानंतर देशातील विविध नेत्यांनी विषेशतः केंद्र सरकारमधील पंतप्रधानापासून अनेक मंत्र्यांनी त्यांची विचारपूस केली. शरद पवार यांनी देखील ट्विटरवरून त्यांचे आभार मानले. पण विचारपूस करणाऱ्याच्या ट्वीटमध्ये दिल्लीतील राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांचा उल्लेख नाही. त्यामुळे एकीकडे भाजपच्या नेत्यांची शरद पवारांशी जवळीक वाढू लागलीय, तर काँग्रेसचे नेते पवारांपासून अंतर ठेवून आहेत, असं दिसून येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram