Karnataka Covid rules | कर्नाटकची ऐनवेळी दडपशाही! कोरोना निगेटिव्ह रिपोर्टशिवाय राज्यात प्रवेश नाही
महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट घेवून येणे आवश्यक आहे. ही टेस्ट 72 तास अगोदर केलेली असली पाहिजे. जिल्ह्यात बाहेरील राज्यातून कर्नाटकात येण्याच्या मार्गावर चेक पोस्ट सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी दिली.