No Confidence on PM: मोदी सरकारविरोधात विश्वास प्रस्ताव आणणार, मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक

Continues below advertisement

लोकसभेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. मणिपूरमधील हिंसाचार आणि तिथली एकंदर परिस्थिती यावर स्वतः पंतप्रधान मोदींनी निवेदन करावं, अशी विरोधकांची मागणी आहे. याच मागणीवरून काल दिवसभर संसदेत गदारोळ झाला, आणि परिणामी दिवसभर संसदेचं कामकाज ठप्प होतं. अविश्वास प्रस्तावामुळे मोदी सरकारला कुठलाही धोका नसला, तरी त्यामुळे मणिपूरमधील हिंसाचाराची जनमानसात अधिक चर्चा होईल, आणि मोदी सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागेल, अशी विरोधकांची रणनीती आहे. याबाबत काल विरोधकांची बैठक देखील झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram