शॉकिंग! ऊर्जामंत्री Nitin Raut यांच्या बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी

बातमी सरकारी बंगल्यावर उधळपट्टी करणाऱ्या महाविकास आघाडीतील मंत्र्याची. हे मंत्रीमहोदय आहेत ऊर्जामंत्री नितीन राऊत. त्यांच्या सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याचा आरोप भाजपने केलाय आणि तसे व्हिडीओ तसंच फोटोही समोर आणलेत. एकीकडे शेतकऱ्यांची वीज तोडली जातेय, सामान्यांना लॉकडाऊन काळात भल्यामोठ्या रकमांची बिलं दिली जातायत. न भरल्यास त्यांचही कनेक्शन कट होतंय. असं असताना ज्या जनतेच्या जिवावर तुम्ही मंत्री झालात, त्यांच्याच पैशाची अशी उधळपट्टी तुम्ही कशी करू शकता असा सवाल भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी विचारलाय. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola