Nitin Raut : SC-ST उपवर्ग संदर्भात कोर्टाचा निर्णय संविधानाला तडे देणारा
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील उपवर्ग व नॉनक्रिमिलिअर संदर्भात जो निर्णय दिला. त्या विरोधात आज भारत बंद पुकारण्यात आला असून काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी देखील या बंद ला समर्थन दिले आहे. संविधानाने समानतेचे धोरण स्वीकारले असता उपवर्ग संदर्भात न्यायालयाचा निर्णय संविधानाच्या समानतेच्या तत्वाला तडे देणार असल्याचे नितीन राऊत म्हणाले. सार्वच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारच्या दबावात आल्याचा दावा नितीन राऊत यांनी केला. या सर्व विषयासंदर्भात त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.