Nitin Raut On Eknath Shinde : आंबेडकरी जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा सूड घेईन;नितीन राऊतांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Nitin Raut On Eknath Shinde : आंबेडकरी जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा सूड घेईन;नितीन राऊतांचा हल्लाबोल

 

मुख्यमंत्री साहेब तुमचे वक्तव्य आंबेडकराईट संघटना आणि आम्हाला नक्षलवादी ठरवण्यासारखे आहे... संविधानाच्या संरक्षणासाठी अग्रेसर दलित संघटनांना मुख्यमंत्री शहरी नक्षलवादी म्हणत असतील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी जनता याचा सूड घेईल - काँग्रेस नेते नितीन राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती आरोप....

राज्यात लोकसभा निवडणुकी मध्ये काही अर्बन नक्षल सक्रीय होते आणि त्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एनडीए सरकारकडून संविधान बदललं जाईल अशी वातावरण निर्मिती केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे...

संविधानाच्या संरक्षणासाठी आंबेडकराईट जनता आणि आंबेडकरवादी संघटना अग्रेसर असतात, त्यांना जर मुख्यमंत्री अर्बन नक्षल म्हणत असतील, तर त्यांच्या या वक्तव्याचा सूड येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी जनता घेतल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे..

मुळातच दलित, बहुजन, अल्पसंख्यांक यांच्यासाठी संविधान संवेदनशील विषय असताना मुख्यमंत्री शहरी नक्षलवाद्यानी संविधान बदल बद्दल विचार पसरवले असे म्हणत असतील, तर ही मोठी चूक आहे.. मुख्यमंत्र्यांचा वक्तव्य म्हणजे दलित संघटन आणि आम्ही दलित नेत्यांना शहरी नक्षलवादी म्हणण्यासारखं आहे असे ही राऊत म्हणाले..

मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वतः असंवैधानिक सरकार चालवत आहात.. त्यामुळे तुम्ही स्वतः काय आहात हे पहा... एका मुख्यमंत्र्याला असे आरोप शोभत नाही.. मुख्यमंत्र्यांचा वक्तव्य म्हणजे बालिशपणा आहे असे ही नितीन राऊत म्हणाले...

आणि जर नक्षलवादी आता फक्त गडचिरोली पर्यंत मर्यादित राहिलेले नसेल आणि ते राज्यभर पसरले असेल, तर हे मुख्यमंत्र्यांचे अपयश असून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या हाताबाहेर गेली आहे, अशी टीका ही राऊत यांनी केली..

राज्यात आंबेडकरी संघटना दलित संघटना शहरी नक्षलींशी जोडलेली आहे अशी काही माहिती राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल, तर त्याचा पुरावा त्यांनी सर्वांसमोर ठेवावा अशी मागणी ही नितीन राऊत यांनी केली आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram