Nitin Raut : राज्यात उष्णता वाढल्यानं विजेची मागणी वाढली, लोडशेडिंग होणार नाही : नितीन राऊत
Continues below advertisement
Nitin Raut : राज्यात उष्णता वाढल्यानं विजेची मागणी वाढली, छोट्या-मोठ्या घटना वगळता लोडशेडिंग नाही. वीज कामगारांच्या संपावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची पत्रकार परिषद, राज्यात उष्णता वाढल्यानं विजेची मागणी वाढली. विजेची मागणी आज २८ मेगावॅटपर्यंत पोचली, कोळसा टंचाई लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवलं. कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी पुरवठा थांबवणार नाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची महिती. कामगार नेत्यांशी चर्चेला सरकार तयार आहे. याच वेळी प्रधान सचिव कंट्रोल रुममधून परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं, संपात सहभागी न होता कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना माझा सलाम.
Continues below advertisement